नवनिर्वाचित उपमहापौरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या खिशावर चोरट्यांचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

नवनिर्वाचित उपमहापौरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला. कार्यकर्त्यांपैकी एकाने चोरट्याला रंगेहाथ पकडले. ही घटना पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात घडली. पिंपरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे

पिंपरी - नवनिर्वाचित उपमहापौरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला. कार्यकर्त्यांपैकी एकाने चोरट्याला रंगेहाथ पकडले. ही घटना पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात घडली. पिंपरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी (ता.6) पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदाची निवडणूक असल्याने महापालिका भवनात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. महापालिका सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी नवनिर्वाचित उपमहापौर केशव घोळवे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. गर्दीचा फायदा घेत पाकिटचोरही या दालनात शिरले. येथे जमलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या खिशावर त्यांनी डल्ला मारला.

भागिदारीत व्यवसाय करण्याच्या नावाखाली वीस लाखांचा अपहार 

दरम्यान, एका कार्यकर्त्याच्या खिशात हात घालताना एकाने या दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे रक्कमही सापडली. याबाबत तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या पिंपरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. 

'ओपन बार'ला महापालिकेची बाकडे; कमिशनरसमोर मांडली नागरिकाने वस्तुस्थिती 

दरम्यान, या घटनेमुळे महापालिका भवनात खळबळ उडाली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves pockets activists congratulate newly elected deputy mayor