
रमजान हा वारंवार टीव्ही बघत होता. त्यामुळे त्याची आई त्याला रागविली.
पिंपरी : वारंवार टीव्ही बघतो म्हणून आई रागावल्याने तेरा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिखली येथे घडली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रमजान अब्दुल शेख (वय 13, रा. जाधववाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. रमजान हा वारंवार टीव्ही बघत होता. त्यामुळे त्याची आई त्याला रागविली. याचा रमजानला राग आला. या रागातून त्याने मंगळवारी (ता. 1) सायंकाळी पाचच्या सुमारास राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. यामध्ये तो बेशुद्ध पडला. काही वेळाने हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
उपचारादरम्यान, त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रमजानचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिखली पोलिस तपास करीत आहेत. अवघ्या तेरा वर्षीय मुलाने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला आहे. अशा घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.