पिंपरीत दुकानावर दगडफेक; मोटारीची तोडफोड

बंद दुकानावर दगड मारून मोटारीवर लोखंडी रॉड मारून तोडफोड केल्याची घटना पिंपरीतील कॅम्प परिसरात शनिवारी रात्री घडली.
पिंपरीत दुकानावर दगडफेक; मोटारीची तोडफोड
sakal

पिंपरी: बंद दुकानावर दगड मारून मोटारीवर लोखंडी रॉड मारून तोडफोड केल्याची घटना पिंपरीतील कॅम्प परिसरात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कॅम्प परिसरात रात्रीच्या वेळी तिघेजण आल्याचे दिसत असून एकाच्या हातात लोखंडी रॉड आहे.

पिंपरीत दुकानावर दगडफेक; मोटारीची तोडफोड
कॅनडाने भारतातील प्रवाशांवरील उठवली बंदी; पुन्हा सुरू होणार विमानसेवा

बंद दुकानावर दगड मारल्यानंतर दुकानासमोर उभ्या असलेल्या मोटारीवर एकजण लोखंडी रॉड मार्ट असल्याचे दिसत आहेत. त्यानंतर हे तिघेही पुढे निघून गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असणाऱ्या तिन्ही तरुणांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मागील आठवड्यात डिलक्स चौकातील कपड्याच्या दुकानातही तोडफोडीची घटना घडली होती. दुकानात शिरलेल्या तिघांनी कोयत्याने दुकानातील साहित्याची तोडफोड करीत कामगारावर हल्ला केला. यामुळे घाबरलेले इतर कामगार घराबाहेर पळाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com