महिलांनो, आता तुमच्यासाठी व्यायामशाळांमध्ये राहणार वेळ राखीव

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

  • पिंपरी-चिंचवडमधील व्यायामशाळांमध्ये महिलांसाठी वेळ राखीव 

पिंपरी : महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये महिलांसाठी रोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक तास या प्रमाणे दररोज दोन तास राखीव वेळ ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महिलांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या शहरात 82 व्यायामशाळा आहेत. त्यातील 32 व्यायामशाळा महापालिकेतर्फे तर 50 व्यायामशाळा सेवाशुल्क तत्वावर खासगी संस्थामार्फत चालविल्या जात आहेत. मार्चपासून व्यायामशाळा बंद होत्या. आता त्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना काळात महिला व नागरिक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे. महिलांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सर्व व्यायामशाळांमध्ये सकाळी एक तास व सायंकाळी एक तास असे दोन तास महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

व्यायामशाळांमध्ये महिलांसाठी वेळापत्रक 
स्वरुप    सकाळी सायंकाळी 
महापालिका संचलित 9 ते 10  4 ते 5 
खासगी संस्थांद्वारे संचलित 10 ते 11  3 ते 4

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: time reserved in gym for women at pimpri chinchwad