मावळात दिवसभरात ७१ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ४ हजार ७१२

मावळात दिवसभरात ७१ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ४ हजार ७१२

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात बुधवारी दिवसभरात ७१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ७१२ झाली आहे. आत्तापर्यंत १६१ जणांचा मृत्यु झाला आहे. ३ हजार ९०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ८० जणांना घरी सोडण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ७१  जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक २५, कामशेत येथील नऊ, लोणावळा येथील सहा, वडगाव व कोथुर्णे येथील प्रत्येकी चार, माळवाडी, सोमाटणे व गहुंजे येथील प्रत्येकी तीन, टाकवे बुद्रुक, दहीवली व आंबी येथील प्रत्येकी दोन, कुसगाव बुद्रुक, इंदोरी, शिरगाव, भाजे, पाटण, करूंज, बुधवडी व तळेगाव दाभाडे ग्रामीण   येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ७१२ झाली असून त्यात शहरी भागातील २ हजार ७३५ तर ग्रामीण भागातील १ हजार ९७७ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १ हजार ४२५, लोणावळा येथे १ हजार २६ तर वडगाव येथे रुग्णसंख्या २८४ एवढी आहे. आत्तापपर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ९०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ८० जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ६५१ सक्रिय रुग्ण असून त्यातील ४२६ लक्षणे असलेले तर २२५ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४२६  जणांमध्ये ३४३ जणांमध्ये सौम्य तर ७७ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सहा जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ६५१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com