VIDEO : तुम्ही तंबाखू खात असाल, तर ते कोरोनासाठी...

रविवार, 31 मे 2020

गेली पाच महिने आख्खं जग कोरोनाने ग्रासले आहे. कोरोना पेल्यातील वादळ आहे आणि ते नक्की शमणार आहे. पण त्यानिमित्ताने अनेकांनी आहार, व्यायाम दिनचर्या आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता या गोष्टींना महत्त्व दिले आहे.

पिंपरी : गेली पाच महिने आख्खं जग कोरोनाने ग्रासले आहे. कोरोना पेल्यातील वादळ आहे आणि ते नक्की शमणार आहे. पण त्यानिमित्ताने अनेकांनी आहार, व्यायाम दिनचर्या आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता या गोष्टींना महत्त्व दिले आहे. पण धुम्रपान फुफ्फुसांना संक्रमित करून कोरोनासारख्या आजारांना निमंत्रित करतो, त्यांना इतरांच्या तुलनेत कोरोना होण्याची शक्‍यता अधिक असते. मग आपण तंबाखूचे व्यसन का सोडत नाही, असा प्रश्‍न अनेक दंतचिकित्सांनी वेबिनारच्या माध्यमातून 'जागतिक तंबाखू विरोधी' दिनानिमित्त उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थामुळे होणारे आजार आणि हे पदार्थ खाणं का टाळावे याबद्दल वेबिनार जनजागृती करण्यात येत आहे. वूमन डेंटल आयडिएच्या सचिव डॉ. मनीषा गरुड म्हणाल्या, "मौखिक कॅन्सरमुळे भारतात वर्षभरात दहा लाख लोकांचा मृत्यू होतो. तर कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे, असे असतानाही शंभर टक्के जग आपल्या दिनचर्येत बदल करू लागले आहे. कोणी व्यायामाला सुरुवात केली आहे, तर कोणी साखर सोडली. कोणी काही कला आत्मसात केल्या आहेत. लहान मुले गेली अडीच महिने बाहेर पडण्यापासून वंचित राहिले, हे सगळे जर स्वतः बदल करू शकतात, तर आपल्याला तंबाखू सोडण्याबाबत इतके अवघड आहे का? निश्‍चितच नाही फक्त गरज आहे मनाला मुरड घालण्याची आणि योग्य मार्गदर्शनाची.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. संतोष पिंगळे म्हणाले, "स्मोकिंगमुळे फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. तंबाखूचे सेवन करत असाल, तर कोरोनाची लागण होण्याकरिता तुम्ही जास्त संवेदनशील असता. कोरोनाची लागण झाल्यावर 1.4 टक्के जास्त शक्‍यता असते, की तुम्हाला लाइफ सपोर्टची गरज लागेल किंवा पुढे जाऊन आयसीयूची गरज भासेल. म्हणून तुम्हाला जास्त काळजी घ्यायला हवी. मी तंबाखूमुक्त होणार, अशी शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे.''