प्रेमात अडथळा ठरल्याने जुन्या प्रियकराचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of an old lover due to obstruction in love
प्रेमात अडथळा ठरल्याने जुन्या प्रियकराचा खून

प्रेमात अडथळा ठरल्याने जुन्या प्रियकराचा खून

चाकण : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या जुन्या प्रियकराचा नव्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा प्रकार भांबोली (ता. खेड) येथे उघडकीस आला. याबाबत चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी माहिती दिली की, भांबोली येथे इलाईट कंपनीच्या जवळील मोकळ्या जागेत गुरुवारी (ता. २९) संजय वासुदेव पाटील (वय ४०, सध्या रा. चाकण, आगरवाडी रोड, शिक्षक कॉलनी, ता. खेड) या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून व लोखंडी पाईपने मारहाण करून निर्घृणपणे खून करण्यात आला.

याबाबत प्रतिभा संजय पाटील (वय २९, सध्या रा. चाकण, मुळगाव-पथराट, ता. जि. जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी नेहा रोहिदास जाधव (वय १९, रा. आंबेठाण, ता. खेड), प्रेम उघडे, प्रतीक उघडे (दोघेही रा. भांबोली फाटा, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, नेहा हिला अटक केला आहे. संजय व नेहा यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. सध्या नेहा व प्रेम उघडे यांचे प्रेम सुरू होते. त्यात संजय पाटील हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्यांनी कट रचून त्याला निर्जनस्थळी नेऊन डोक्यात दगड घालून लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b01980 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top