माय माऊली प्रतिष्ठानकडून मारुंजीतील ‘नवक्षितीज’ला मदत

माय माऊली प्रतिष्ठानकडून मारुंजीतील ‘नवक्षितीज’ला मदत

वाकड, ता. ९ : मांरूजीतील नवक्षितीज या मतिमंद बालकांचा शिक्षण व सांभाळ करणाऱ्या संस्थेला माय माऊली प्रतिष्ठान, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे व मांगिरबाबा पाणीपुरवठा संस्थेचे माजी अध्यक्ष संपत विनोदे यांच्या वतीने अन्नधान्याची मदत करण्यात आली.
संत तुकाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका कुंदा विनोदे, महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या सदस्या भारती विनोदे, राजेंद्र विनोदे, संतोष विनोदे, निखिल विनोदे, प्रसाद विनोदे आदी उपस्थित होते. गहू, गोडेतेल डबा, हरबरा, डाळ यासह अन्य महिनाभर पुरतील इतक्या जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. ज्या समाजाने आपल्याला वाढविले-घडविले त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्देशाने बाळासाहेब विनोदे मित्र परिवार दरवर्षी नववर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रम राबवून व तिरूपती बालाजी दर्शनाने करतात यंदाही सलग २२ वर्षांची परंपरा कायम राखत हा उपक्रम राबविला.


WKD22A01054, WKD22A01055

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com