मुकाई चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुकाई चौकातील 
वाहतूक नियंत्रक दिवे बंद
विद्यार्थ्यांनी दिला वीजबचतीच्या संदेश

मुकाई चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे बंद

sakal_logo
By

किवळे, ता. १४ : किवळे येथील मुकाई चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. मुकाई चौकात रावेत बीआरटी, विकासनगर, किवळे गावठाण, आदर्शनगर या चार बाजूंनी येणारे रस्ते मिळतात. वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी पालिकेने या ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. मात्र, हे दिवे बऱ्याचदा बंद पडतात. अलीकडे गेल्या काही दिवसांपासून हे दिवे बंद आहेत. परिसरात डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचप्रमाणे गृहसंकुलांची संख्याही झपाट्याने वाढल्याने फ्लॅट धारकांची संख्या वाढली आहे.

या चौकात अलीकडच्या काळात पादचारी दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणावरून हिंजवडी जवळच असल्याने आयटीयन वाहनांचीही भर पडली आहे. तसेच या चौकात पीएमपीएलचे मुकाई बस टर्मिनस आहे. त्यामुळे बस गाड्यांची या चौकात नेहमी वर्दळ असते. वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने बहुतेक वाहने या चौकात विरुद्ध दिशेच्या वाहनांचा विचार न करता सुसाट असतात. त्यामुळे अपघात संभवतो. हे दिवे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी किवळेचे बापूसाहेब तरस, भाऊसाहेब तरस यांनी वतीने केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top