डॉ. प्रसाद ढोरे यांना पी.एच.डी. पदवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. प्रसाद ढोरे यांना पी.एच.डी. पदवी
डॉ. प्रसाद ढोरे यांना पी.एच.डी. पदवी

डॉ. प्रसाद ढोरे यांना पी.एच.डी. पदवी

sakal_logo
By

इंदोरी, ता. ८ ः येथील गावचे प्रा. प्रसाद बबनराव ढोरे यांना जे.टी. विद्यापीठ (राजस्थान) संगणक विभागातील पी. एच. डी.
पदवी प्रदान करण्यात आली. त्यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र ढोरे व बबन शेवकर यांच्याहस्ते व माजी सरपंच दामोदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा पार पडला.
डॉ. प्रसाद ढोरे हे पी.एच.डी. पदवी मिळवणारे, गावातील पहिलेच विद्यार्थी आहेत. त्यांचा कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग मधील
‘मशिन लर्निंग’ असा संशोधनाचा विषय होता. प्रा. डॉ. प्रशांत कुंभारकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. ढोरे म्हणाले,‘‘ माझ्या जडणघडणीत आईवडील व घरातील सर्व घटक तसेच सहकारी शिक्षकवृंद आणि ज्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचा ही वाटा आहे.’’ यापुढेही शिक्षण क्षेत्रातच कार्यरत राहून अनेकविध शैक्षणिक संशोधन करण्याचा, मानस असल्याचे ढोरे यांनी प्रतिपादन केले. संदीप काशीद यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. दिलीप ढोरे व प्रशांत भागवत यांनी संयोजन केले. तर अंकुश ढोरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top