Tue, March 21, 2023

इंद्रेश्वराला भाविकांकडून अभिषेक
इंद्रेश्वराला भाविकांकडून अभिषेक
Published on : 1 March 2022, 10:27 am
इंदोरी, ता. १ ः येथील इंद्रेश्वराच्या दर्शनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत अखंडपणे दर्शनासाठी रांग होती. इंद्रेश्वर मित्र व भजनी मंडळाने कार्यक्रम व भाविकांसाठी फराळाचे नियोजन केले होते. मंदिर व प्रमुख गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट केली होती. पहाटे एक ते सकाळी सातपर्यंत भाविकांनी अभिषेक केला. दुपारी १२ ते रात्री नऊपर्यंत मुकाई महिला भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ व इंद्रेश्वर भजनी मंडळ यांनी भजनसेवा केली. तसेच, तळेगाव दाभाडे येथील सहजयोग केंद्रातर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तणावरहित आनंदी जीवन याविषयी उद्बोधन करण्यात आले. या उत्सवासाठी मुकेश शिंदे, कुंडलिक चव्हाण, रमेश राऊत, राजू शिंदे, प्रशांत गरुड, चेतन चव्हाण, संकेत शिंदे यांनी परिश्रम घेतले.