कागल : चैतन्य महाराज वाडेकर यांचे बुधवारी कागलमध्ये कीर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : चैतन्य महाराज वाडेकर यांचे बुधवारी कागलमध्ये कीर्तन
भजनी भारुड संघाच्या अध्यक्षपदी गोपाळ पवळे

कागल : चैतन्य महाराज वाडेकर यांचे बुधवारी कागलमध्ये कीर्तन

sakal_logo
By

चैतन्य महाराज वाडेकर यांचे
बुधवारी कागलमध्ये कीर्तन
कागल : सहकारातील आदर्श व्यक्तिमत्त्व, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (स्व.) राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त युवा कीर्तनकार ह. भ. प. चैतन्य महाराज वाडेकर यांच्या सुश्राव्य कीर्तन सोहळ्याचे बुधवारी (ता. १३) आयोजन केले आहे. येथील श्रीराम मंदिरासमोरील खर्डेकर चौकात सायंकाळी सहाला हा कीर्तन सोहळा होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली. शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार असून, या वेळी राजे प्रवीणसिंह घाटगे, नंदितादेवी घाटगे, वीरेंद्रराजे घाटगे, श्रेया घाटगे यांच्यासह राज परिवारतील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शाहू ग्रुप व राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे केले आहे. या कीर्तन सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top