मावळात दिवसभरात १०१ जण पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळात दिवसभरात
१०१ जण पॉझिटिव्ह
मावळात दिवसभरात १०१ जण पॉझिटिव्ह

मावळात दिवसभरात १०१ जण पॉझिटिव्ह

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ३१ ः मावळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात १०१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्या ३२६ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३१ हजार ३८० झाली असून, आतापर्यंत ५२५ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० हजार १४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १०१ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ७२, सोमाटणे येथील ११, परंदवडी व टाकवे बुद्रुक येथील प्रत्येकी चार, लोणावळा व नवलाख उंब्रे येथील प्रत्येकी दोन, वडगाव, आढले बुद्रुक, दिवड, मोरवे व नायगाव येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. सध्या तालुक्यात ७०८ सक्रिय रुग्ण असून, त्यात तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ४६१, लोणावळा येथील ६५, वडगाव येथील २५ व ग्रामीण भागातील १५७ जणांचा समावेश असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top