Pune News : धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता यज्ञ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cleanliness Yagya Dharmadhikari Foundation
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता

Pune News : धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता यज्ञ!

वडगाव मावळ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मावळ तालुक्यातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे अभियान राबविण्यात आले.

लोणावळा, खंडाळा, मळवली, कामशेत, पवनानगर, कान्हे, वडगाव, तळेगाव, देहूरोड येथे सकाळी सात ते अकरा या वेळात ८२० स्वयंसेवकांच्या सहभागाने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी सुमारे चोवीस टन घनकचरा गोळा करण्यात आला. या अभियानासाठी स्थानिक ग्रामपंचायत व नगरपालिका यांनी सहकार्य केले.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाषाण तलाव उद्यान, इंडियन ख्रिश्चन सेमेट्री हडपसर, एस.एन.डी.टी युनिर्व्हसिटी पुणे कॅम्पस,

सुतारदरा आणि केळेवाडी झोपडपट्टी परिसरात स्वच्छ अभियान मोहीम राबविण्यात आली होती. स्वरूपा सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एन.डी.टी युनिर्व्हसिटी पुणे कॅम्पस येथे महिला सदस्यांनी स्वच्छ अभियानामध्ये सहभाग घेतला. त्यात सुमारे ४५ टन कचरा गोळा करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची गरज असल्याचे नमूद करून सचिन धर्माधिकारी म्हणाले, ‘‘स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विवेक जागृत ठेवणे हे आपण बैठकीतून शिकलो. आपण आंघोळ करतो म्हणजे शरीराने स्चच्छ राहण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या मनातील विकारांचा चाललेला घोळ कसा काढायचा हे आपण बैठकीतून शिकलो. बैठकीतील सदस्य एकत्रितपणे आपला अहंकार बाजूला ठेवून महापालिकेच्या मदतीने परिसर स्वच्छ करतात.’’

वृक्ष संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण प्रत्येकाने बांधाबांधावर वृक्ष लावणे जरुरीचे आहे. ते जर केले तरच जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढेल अन्यथा पाण्याची पातळी वाढणार नाही. नानासाहेबांनी आणि आप्पासाहेबांनी विकारांवर नियंत्रण ठेवायला शिकविले. त्यातील सर्वांत महत्त्वाचा विकार म्हणजे अहंपणा; तो बाजूला ठेवला तरच आपण समाजाचे पर्यायाने देशाचे आरोग्य सतत स्वच्छतेने उत्तम ठेवू शकतो.

- डॉ. सचिन धर्माधिकारी

आकडे बोलतात

  • मोहिमेत पाच हजार ५६५ पुरुषांचा सहभाग

  • दोन हजार ४२१ महिलांनी घेतला भाग

  • एकूण १५०.८७७ टन कचरा गोळा करण्यात आला.

टॅग्स :PimpriPune News