road accident
road accidentsakal

रस्त्यालगत उभ्या रुग्णवाहिकेला टेम्पोची धडक; रुग्णवाहिका चालकासह महिलेचा मृत्यू

टायर बदलण्यासाठी रस्त्यालगत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला, भरधाव टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिका चालकासह महिलेचा मृत्यू झाला.
Summary

टायर बदलण्यासाठी रस्त्यालगत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला, भरधाव टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिका चालकासह महिलेचा मृत्यू झाला.

पिंपरी - टायर बदलण्यासाठी रस्त्यालगत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला, (Ambulance) भरधाव टेम्पोने (Tempo) पाठीमागून जोरात धडक (Hit) दिली. या अपघातात रुग्णवाहिका चालकासह महिलेचा मृत्यू (Women Death) झाला. तर, तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई- बेंगलोर महामार्गावरील चांदणी चौक येथे घडली.

रुग्णवाहिका चालक महेश विश्वनाथ सरवडे (वय ४४, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई), सीताबाई हरी चव्हाण (वय ५४, रा. पेंदरगाव, तळोजा) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर मनोहर हरी चव्हाण (वय २६), राजा हरी चव्हाण (वय ३५), शिवाजी मारुती खडतरे (वय ३०) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी गोपाळ भीमला चव्हाण (वय ४५, रा. तळोजा एमआयडीसी, पनवेल) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

road accident
पिंपरी चिंचवडमधील आजचे गुन्हे वृत्त

त्यानुसार टेम्पो चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता.२४) पहाटे पाचच्या सुमारास रुग्णवाहिका चांदणी चौकात रस्त्यालगत टायर बदलण्यासाठी थांबली होती. रुग्णवाहिकेचा चालक व क्लीनर हे टायर बदलत होते.

त्यावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने रुग्णवाहिकेला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये रुग्णवाहिकेचा चालक सरवडे यांच्यासह सीताबाई यांचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेचा क्लीनर व इतर दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com