हॉटेलचे नाव एक 
परवाना मात्र दुसराच
वाकडमधील प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल

हॉटेलचे नाव एक परवाना मात्र दुसराच वाकडमधील प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, ता. १ : हॉटेलचे नाव एक व परवाना दुसऱ्याच नावाचा असा प्रकार वाकड येथे उघडकीस आला. याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेलचा मॅनेजर अनुराग सुभाष भिलारे (रा. शुक्रवार पेठ, शाहू चौक, पुणे ) व हॉटेलचा मालक चिराग संदीप थोरवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री अकरापर्यंतच हॉटेल सुरु ठेवण्यासह नियमांचे पालन करण्याबाबतचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. दरम्यान, शनिवारी (ता. १) पहाटे साडे तीनच्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना वाकडमधील जगताप डेअरी येथील दि मॅजेस्टिक हे हॉटेल उशिरापर्यंत सुरु असलेले आढळले. त्यामुळे पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई केली. यादरम्यान, हॉटेलचे परवाने तपासले असता, ते पिंपळे निलख येथील आदिनाथ गोपी लंच अँड बार या नावाने असल्याचे आढळले. तर हॉटेलमध्ये दर्शनी भागावर लावलेला परवाना व ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलावर दि मजेस्टिक या हॉटेलचाच उल्लेख होता. त्यावरून आरोपी हे आदिनाथ गोपी लन्च अँड बार या नावाऐवजी दि मॅजेस्टिक हे नाव धारण करून, हॉटेल चालवत ग्राहकांची व शासनाची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com