युक्रेनमधून दोन विद्यार्थी महाडमध्ये सुखरुप घरी

युक्रेनमधून दोन विद्यार्थी महाडमध्ये सुखरुप घरी

महाड, ता. ६ (बातमीदार) : युक्रेनमध्ये युद्धामुळे अडकलेले विद्यार्थी भारतात सुखरूप आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या महाडमधील तिघांपैकी दोन विद्यार्थी आज महाडमध्ये सुखरूप परतले आहेत. मुलांना समोर पाहताच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.

भारतातून युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी पोलंड, रोमानिया या देशाच्या सहकार्यातून मायदेशी आणले जात आहेत. महाड तालुक्यातील बिरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचा मुलगा खुर्रम बिरादार आणि नातेवाईक शोएब पठाण हे आपल्या घरी सुखरूप पोहचले. खुर्रम, शोएब हे आल्याने आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहायला मिळाले; तर या दोघांचे जंगी स्वागतही करण्यात आले.

खूर्रम, शोएब यांनी या युद्धजन्य परिस्थितीत कष्टप्रद दिवस काढावे लागले. कमी तापमानात दोन दिवस पायी प्रवास करत पोलंड सीमेवर आल्याचे त्यांनी सांगितले. या दरम्यान केवळ पाण्यावर दिवसही काढावा लागल्याचा प्रसंग देखील कथन केला. भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करावे तरच आम्हाला खरा आनंद होईल, असे खुर्रमची आई म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com