पिंपरी-चिंचवडेमध्ये १७५ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवडेमध्ये १७५ नवीन रुग्ण

पिंपरी, ता. २ : कोरोना संसर्ग झालेले १७५ रुग्ण रविवारी शहरात आढळले. शहरातील रुग्णसंख्या आता दोन लाख ७९ हजार ४२३ झाली आहे. आज १७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७५ हजार १६० झाली आहे. सध्या ४६८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांत २३४ रुग्ण उपचार घेत आहेत. २३४ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. आजपर्यंत २९ लाख ८२ हजार २५७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ४० मेजर व ३०८ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ७३८ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. दोन हजार ३५० जणांचे विलगीकरण करण्यात आले.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com