सांगवीतील मजूरअड्ड्यावर 
ओमिक्रॉनबाबत जनजागृती

सांगवीतील मजूरअड्ड्यावर ओमिक्रॉनबाबत जनजागृती

जुनी सांगवी, ता. २ ः जुनी सांगवी येथे मानवी हक्क संरक्षण संस्थेच्यावतीने येथील मजूर नाक्यावर
ओमिक्रॉनबाबत जनजागृती करण्यात आली. कोरोनाचे नवनवीन व्हेरीयंट येत आहेत, यामुळे जगभरात धास्ती वाढली आहे. याचे गांभीर्य ओळखून दिलासा संस्था व मानवी हक्क संरक्षण जागृती संघटनेच्यावतीने सांगवीतील मजूर अड्डयावर पथनाट्य, संदेश फलक व स्पीकरद्धारे मजुरांचे प्रबोधन करण्यात आले.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी कोरोनाचे चित्र काढलेला शर्ट व त्यावर नियम पाळा, ओमियक्रॉन टाळा, माझे आरोग्य, माझी जबाबदारी, घाबरु नका, जागरूक रहा, वारंवार धुवा हात, मीच माझा रक्षक असे लिहिलेला शर्ट परिधान केला होता. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी मजुरांना मास्क घालण्याचे, वारंवार हात धुण्याचे, वारंवार सँनीटाझरचा वापर करून गर्दी टाळण्याचे आवाहन केले. यावेळी सांगवी पिंपळे गुरव असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदिप ननवरे यांनी ओमिक्रॉनची बाधा होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता व झाल्यावर घ्यावयाची काळजी यावर मजुरांना माहिती दिली .
यावेळी विकास कुचेकर प्रकाश घोरपडे, पंकज पाटील, मुरलीधर दळवी, विजया नागटिळक, शामराव सरकाळे, डॉ. कैलास पाटील, संगीता जोगदंड, मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार, मीना करंजावणे, विकास शहाणे, हनुमंत पंडित, वसंत चकटे, ऋतुजा जोगदंड, प्रकाश बंडेवार, एकनाथ उगळे, डॉ. पी. एस. अग्रवाल, शरद शेजवळ, विनायक विसपुते आदी उपस्थित होते. सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले तर श्रीकांत चौगुले यांनी आभार मानले.
फोटो
जुनी सांगवी ः मजूर नाक्यावर ओमिक्रॉनबाबत जनजागृती करताना मानवी हक्क संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com