सांगवी ः आमदार चषक क्रिकेट स्पर्धेस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवी ः आमदार चषक क्रिकेट स्पर्धेस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.
सांगवी ः आमदार चषक क्रिकेट स्पर्धेस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

सांगवी ः आमदार चषक क्रिकेट स्पर्धेस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

sakal_logo
By

सांगवीतील क्रिकेट स्पर्धेस
चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
जुनी सांगवी, ता. १० ः येथे लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या वतीने आमदार क्रिकेट चषक स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली. माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून विविध भागातून या स्पर्धेत ९२ संघांनी भाग घेतला. रविवारी अंतिम सामन्यासाठी माजी महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अंतिम सामन्यास उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते आमदार लक्ष्मण जगताप मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान महिला डॉक्टर, पत्रकार, पोलिस, नगरसेवक यांनीही मैत्रीपूर्ण क्रिकेट लढती खेळत क्रिकेटचा आनंद घेतला. या वेळी महापौर उषा ढोरे, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, संतोष कांबळे, अजय दुधभाते, उषा मुंडे, हर्षल ढोरे, मनीष कुलकर्णी, जवाहर ढोरे, माधवी राजापुरे, सांगवी पोलिस गुन्हे निरिक्षक सुनील तांबे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top