मावळातील शिवालय यंदा गजबणार

मावळातील शिवालय यंदा गजबणार

कामशेत, ता. २८ : मागील दोन वर्षे कोरोनामुळे महाशिवरात्रीला न गजबजलेली मावळातील शिवालय यंदा गजबणार आहे. यासाठी मंदिरे सजवली असून मंदिर परिसरात प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे.
मावळ तालुक्यातील कोंडेश्वर या प्राचीन शिवमंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्या पाठोपाठ वडिवळे येथील संगमेश्वर महादेव मंदिराला मोठी परंपरा आहे. या दोन्ही मंदिरात ग्रामीण भागातील लाखो भाविक महाशिवरात्री निमित्त महादेवाच्या चरणी येत असतात.
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगतच्या घोरवडेश्वर येथील डोंगरावरील शिवालयात ग्रामीण भागासह शहरातील लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असतात. येथील पायथ्याला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन शिवालया प्रमाणे लोणावळ्यातील रायवूड येथे, कामशेत बाजारपेठेतील शिवमंदिरात, वारंगवाडी, वराळे आंबी रस्त्यातील शिवमंदीर भाविकांची श्रद्धेची ठिकाणे आहे.यंदा कोरोना नियम शिथिल झाल्याने भाविकांचा ओढा दर्शनाकडे लागला आहे. त्यामुळे माळेगावचा जबडेश्वर, वडेश्वरचा वटेश्वर, शिवघाटेश्वर सह अन्य मंदिरे सजली आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वेला मंदिराची रंगरंगोटी, सजावट केली असून विद्युत रोषणाई केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com