गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

कंपनीच्या साइटवरून लोखंडी
साहित्य चोरणारा अटकेत

पिंपरी, ता. २० : कंपनीच्या साइटवरून ८६ हजार रुपये किमतीचे विविध प्रकारचे लोखंडी साहित्य चोरून नेणाऱ्या एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना वाकड येथील भूमकर चौक येथे घडली. चंदू गोरख सकट (वय ३२, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बादशहा महादेव माने (वय ५०, रा. बालाजी रेसिडेन्सी, नऱ्हे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ मार्चला फिर्यादी माने यांचे लोखंडी प्राप्स, वेलर व्हर्टिकल व लेजर असे ८६ हजार रुपये किमतीचे साहित्य सकट याने टेम्पोतून चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर माने यांनी पोलिसात तक्रार दिली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------
नोकरीला लावण्याच्या आमिषाने फसवणूक
नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ३९ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विजय काशिनाथ तांबे (वय ३८, रा. सुप्रिम अंगण सोसायटी, वाघोली) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फारुख अहमदअली लासकर (वय ४०, रा. हरगुडे वस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दापोडीतील सीएमई गेट व पिंपरी टाटा मोटर्स कंपनी येथे घडला आहे. फिर्यादी तांबे यांना तसेच
त्यांचा मित्र सुनील लक्ष्मण बगाडे यांच्या मुलींना टाटा मोटर्स कंपनीत
कामाला लावतो, असे आमिष फारूखने दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ऑनलाइन व रोख असे ३९ हजार रुपये घेतले, तसेच फारुखने व्हाट्सॲपवर टाटा मोटर्स कंपनीच्या नावाचे खोटे जॉइनिंग लेटर फिर्यादी यांना पाठवले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..