बेघरांना मिळाली केंद्राची ‘सावली’ पिंपरी कॅम्पमध्ये केंद्राची सुरवात, महापालिकेकडून नाश्‍ता व भोजनाची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेघरांना मिळाली केंद्राची ‘सावली’
पिंपरी कॅम्पमध्ये केंद्राची सुरवात, महापालिकेकडून नाश्‍ता व भोजनाची सोय
बेघरांना मिळाली केंद्राची ‘सावली’ पिंपरी कॅम्पमध्ये केंद्राची सुरवात, महापालिकेकडून नाश्‍ता व भोजनाची सोय

बेघरांना मिळाली केंद्राची ‘सावली’ पिंपरी कॅम्पमध्ये केंद्राची सुरवात, महापालिकेकडून नाश्‍ता व भोजनाची सोय

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः कासारवाडीत पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी अवस्थेत एक ७६ वर्षीय महिला मदतीच्या अपेक्षेत होती. सावली बेघर निवारा केंद्राच्या टीमने धाव घेतली. महापालिका रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले. पूर्ण बरी झाल्यानंतर सीताबाई तुकाराम हिरामण यांच्यासारख्या आता २५६ बेघरांना केंद्राची हक्काची ‘सावली’ मिळाली आहे.
शहरातील बेघरांना ‘सावली’ देण्याच्या उद्देशाने महापालिकेने पिंपरी कॅम्पमध्ये केंद्राची सुरवात केली. बेघरांना आपलेच आप्त मानणाऱ्या एम. ए. हुसेन यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी आहे. ‘रिअल लाइफ रिअल पिपल’ या संस्थेतर्फे हे केंद्र चालवले जाते. या सर्वांना महापालिकेतर्फे चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय केली जात आहे. बेघरांना या केंद्रामध्ये निवारा देण्याबरोबरच आता त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठीही ते धडपडत आहेत. सध्या केंद्रामध्ये २५६ बेघर आश्रयाला आहेत. लॉकडाउनमध्ये हे निवारा गरीबांसाठी आधार केंद्र बनली आहेत. यामध्ये अनेक शिकलेले, संगणक चालवता येणारे तसेच अभ्यासू आहेत. मात्र, परिस्थितीमुळे ते मानसिक रोगी बनले आणि बेघर झाले. अशा हुशार २५ बेघरांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम केले आहे. तर ३० लोकांना त्यांच्या गावाचा शोध घेऊन सुखरूप पाठवणी केली आहे
असे आहे केंद्र
महापालिकेने ‘दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका’ अभियानाअंतर्गत पिंपरीत २०२० मध्ये ‘सावली’ निवारा केंद्र सुरू केले. या केंद्रात एकूण २४ खोल्या आणि १०० खाटा आहेत. केंद्रामध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. केंद्राचे सचिन बोधनकर, अग्नेश फ्रान्सिस, मिलिंद माळी, अमोल भाट, सुनीता श्रीनाथ, लक्ष्मी वाईकर, उमा भंडारी, वंदना नायडू हे कर्मचारी निराधार लोकांचे संगोपन दैनंदिन देखभाल करतात. कोणतेही कागदपत्रे नसलेल्या निराधार, हतबल लोकांना या केंद्रामार्फत आधारकार्ड, पॅन कार्ड ही महत्वाची कागदपत्रे काढून दिली जातात, असे संस्थेचे एमएसडब्‍ल्‍यू गौतम थोरात यांनी सांगितले.

कोट
समाजातील संवेदनशील नागरिक आम्हाला कळवतात, आमची टीम त्यांना रिक्षातून घेऊन येते. महापालिकेच्या नियमानुसार संबधित पोलिस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया करून महापालिका रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाते. निवारा केंद्रातील आरोग्यसेविकासह इतर सर्व कर्मचारी त्यांची पूर्ण देखभाल करतात. त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का? याचा शोध घेतला जातो. मानसिक, शारीरिक तंदुरुस्त लाभार्थीचे पुनर्वसन केले जाते.
- एम. ए. हुसेन, संचालक, रिअल लाईफ रिअल पीपल संस्था


पुण्यातील मंगळवार पेठेतील गाडीतळ येथे खूप वर्षे घरकाम करत होते. तरुण वयात विधवा झाले. नातेवाईकांनी तोंड फिरवले. ओळखीच्या लोकांनी मला केंद्रात दाखल केले. इथे संगोपन आणि देखभाल केली जातेय.
- शोभा दत्तू आरगडे (वय ७०)

मला यमुनानगर येथून डिसेंबरमध्ये रिक्षातून आणले. रस्त्यावर सिग्नलला सापडलो. मी एक डोळ्याने अंध आहे. व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त झाले. इथल्या वातावरणामुळे त्याला मायेची उब मिळाली. नातेवाईकांचा शोध घेतोय.
-मधुकर रंगनाथ गालफाडे (वय ५८)
फोटो ः 33902, 33904

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top