बडतर्फी साठी २४ जणांना कारणे दाखवा, तर १५४ जणांना आरोप पत्र 

बडतर्फी साठी २४ जणांना कारणे दाखवा, तर १५४ जणांना आरोप पत्र

बडतर्फी साठी २४ जणांना कारणे दाखवा, तर १५४ जणांना आरोप पत्र बडतर्फी साठी २४ जणांना कारणे दाखवा, तर १५४ जणांना आरोप पत्र

संपावरील एसटी कामगारांना
पिंपरीत कारणे दाखवा नोटीस
पिंपरी, ता. १० : एस टी महामंडळाने संपावरील कर्मचाऱ्‍यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. संपात सहभागी झालेल्या २४ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यास महामंडळाने सुरुवात केली आहे. तर १५५ जणांवर कामावर गैरहजेरीबाबत आरोपपत्र ठेवले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी सात नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटीची वाहतूक आठ नोव्हेंबरपासून बंद आहे. हा संप सुरू होऊन दोन महिन्‍यांचा कालावधी उलटत आहे. एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. काही कर्मचाऱ्यांनी एसटीकडून देण्यात आलेल्या संधी दरम्यान कर्तव्यावर हजर झाले आहेत. संपात सामील झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. सध्या वल्लभनगर एस. टी. आगारात सुमारे २१३ कर्मचारी आहेत. त्यापैकी २४ कर्मचारी कामावर आले आहेत. आजही सुमारे १८१ कर्मचारी संपात सहभागी आहेत. ६३ दिवस गैरहजर राहिलेल्या या कर्मचाऱ्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाने संपावरील कर्मचाऱ्यांना बडतर्फीचा इशारा दिला आहे. तुम्हाला बडतर्फ का करू नये, अशी विचारणा केली आहे. १५५ जणांवर आरोपपत्र ठेवले आहे. त्या कर्मचाऱ्यांना प्रथम पंधरा दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर तीन वेळा सुनावणीसाठीलाही हजर राहण्याच्या सूचना असतात. त्यालाही प्रतिसाद न दिल्यास बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली जाते.
एसटीच्या विलीनीकरणासाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या विरोधात बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com