हत्यारे बाळगणाऱ्या पाच जणांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्यारे बाळगणाऱ्या
पाच जणांवर कारवाई
हत्यारे बाळगणाऱ्या पाच जणांवर कारवाई

हत्यारे बाळगणाऱ्या पाच जणांवर कारवाई

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : दिघी, किवळे व भोसरी येथे केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवाईत पोलिसांनी हत्यारे बाळगणाऱ्या पाच जणांवर कारवाई केली. सुरा बाळगल्याप्रकरणी योगेश दिलीप मेदनकर (वय २७, रा. गजानन महाराज नगर, श्रीराम कॉलनी, दिघी) याच्यावर दिघी पोलिसांनी कारवाई केली. दिघीतील नगर रोड येथे ही कारवाई करण्यात आली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत. तर दुसरी कारवाई किवळे येथील बापदेवनगर येथे गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने केली. १७ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांकडून दोन तलवारी जप्त केल्या. त्यांच्यावर देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भोसरीतील उड्डाणपुलाखाली करण्यात आलेल्या कारवाईत विलास धाबु ढेबे (वय २३, रा. कॉलनी क्रमांक २, भारतमाता नगर, दिघी) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top