डॉ. डी वाय. पाटील फार्मसीच्या ‘हिल मॅजिक’ प्रकल्पाची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. डी वाय. पाटील फार्मसीच्या
‘हिल मॅजिक’ प्रकल्पाची निवड
डॉ. डी वाय. पाटील फार्मसीच्या ‘हिल मॅजिक’ प्रकल्पाची निवड

डॉ. डी वाय. पाटील फार्मसीच्या ‘हिल मॅजिक’ प्रकल्पाची निवड

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस रिसर्च महाविद्यालयाच्या ‘हिल मॅजिक’ या प्रकल्पाची एमएचआरडीअंतर्गत घेतलेल्या नॅशनल इनोव्हेशन कॉन्टेस्टमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये प्रकल्पासाठी अनुदान प्राप्त करणारे, राष्ट्रीय पातळीवर एकमेव फार्मसी महाविद्यालयाची निवड झाली आहे.

‘हिल मॅजिक’ हा प्रकल्पांतर्गत जखमेच्या उपचारांसाठी नावीन्यपूर्ण पद्धतीने विकसित केलेल्या औषधांसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. पोल्ट्री उद्योगातील टाकाऊ उत्पादनांचा समावेश या प्रकल्पामध्ये केलेला आहे. हा प्रकल्प पूर्णपणे नैसर्गिक आहे, याचसोबत पोल्ट्री व्यवसायातील टाकाऊ पदार्थांचे स्थिर उत्पादनांत रूपांतर करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. प्रकल्पाच्या टीममध्ये इनोव्हेटर डॉ. आशा थॉमस, प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, मार्गदर्शक डॉ. धीरज नागोरे, सल्लागार विजया मंडाले, ज्ञानेश्‍वर खोडसे, अनिकेत निकम या संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच ‘इंटरनॅशनल सिम्पोझिअम इन मेडिटेशन थेरपी मॅनेजमेंट-२०२१’ विविध पारितोषिके प्राप्त झाली. आफिया गणाचारी (तृतीय वर्ष फार्म.डी.)प्रथम क्रमांक- पोस्टर सादरीकरण, रिया जोसेफ (चतुर्थ वर्ष फार्म.डी ) प्रथम क्रमांक -इंस्टाग्राम क्वीझ आणि प्रा. डॉ. शिवानी देसाई यांना उत्कृष्ट मेंटर म्हणून या परिषदेत सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल डॉ. डी वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील व संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांनी प्रकल्पातील सर्व सहभागी सदस्यांचे अभिनंदन केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top