सर्वज्ञ ताठे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वज्ञ ताठे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा
सर्वज्ञ ताठे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा

सर्वज्ञ ताठे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ ः महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयातील इयत्ता ५ वी तील सर्वज्ञ ताठे राज्यात पाचवा तर शहरात पहिला आला आहे. शहरातील पाचवीचे १०३ तर आठवीचे ७५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शहरात इयत्ता पाचवी चा निकाल २७.०१तर इयत्ता आठवीचा निकाल २४.१८ इतका लागला आहे.
परीक्षा ऑगस्ट महिन्यात ऑफलाइन घेण्यात आली. पिंपरी-चिंचवडमध्ये यंदा शिष्यवृत्ती परीक्षेस ५९५७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५०१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शिष्यवृत्ती परीक्षा ही एप्रिल महिन्यात होत असते. मात्र, कोरोनामुळे दोन ते चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेविषयीची मानसिकता बदलली, याचा परिणाम निकालावर झाला आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. सर्वज्ञ ताठे हा २८४ गुण मिळवून शहरात पहिला व राज्यात पाचवा आला आहे. तर शुभांग कांबळे हा २७२ गुण मिळवून राज्यात अकरावा आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शाळेत आयोजित केला होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष निळकंठ लोंढे, सचिव अनिल लोंढे, उपाध्यक्ष विश्वनाथ लोंढे, नगरसेवक संतोष लोंढे, मुख्याध्यापिका सुलभा चव्हाण आदी उपस्थित होते. शाळा बंद असतानाही मार्गदर्शिका मंगल आहेर यांनी यू ट्युब व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला. त्यासाठी त्यांनी २००यु ट्युब व्हिडिओ आणि २०० ऑनलाइन टेस्टची निर्मिती केली आहे. ज्याचा लाभ राज्यातील विद्यार्थीही घेत आहेत. विद्यालयाचे आत्तापर्यंत ३०० हून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत झळकले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२०-२१
इयत्ता - अर्ज भरलेले - उपस्थित - पात्र - अपात्र - टक्केवारी
५ वी - ३८१८ -३२०२ - ८६५ - २३३७ - २७.०१
८वी - २१३९ -१८१२ -४२० - १३९२ - २४.१८

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top