समस्या बसथांबा निवारशेडची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समस्या बसथांबा निवारशेडची
समस्या बसथांबा निवारशेडची

समस्या बसथांबा निवारशेडची

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ११ ः येथील बसथांब्याची बिकट अवस्था झाली असून, संबंधित विभागाने बस थांबा शेडची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. फाटलेले छत, समोरून वाहणारे गटार, वाऱ्याने अंगावर उडणारी धूळ अशा अवस्थेत नागरिकांना बसची वाट पाहत बसावी लागते.
पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणेफाटा येथून बेबडओहोळ, उर्से एमआयडी, श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासह पवनमावळातील चाळीस गावांची दळणवळण सेवा चालते. त्यामुळे सोमाटणे फाटा येथील बसथांब्याहून बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ही संख्या विचारात घेऊन लोकप्रतिनिधींच्या विकासनिधी अंतर्गत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बस थांबे उभारण्यात आले होते.
या बसथांब्याची नियमित दुरुस्ती न केल्याने त्याची दुरवस्था झाली. छत फाटले असून आधारस्तंभाला गंज लागल्याने ते धोकादायक झाले आहे. या बसथांब्यासमोरुन सांडपाण्याचे तुंबलेले गटार वाहत असल्याने, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अशा अवस्थेतच नागरिकांना बसथांब्याच्या तुटलेल्या फळीवर बसून बसची वाट पहावी लागते. या जागेचा वापर पीएमपीएएल परिवहन विभाग बस उभी करण्यासाठी करीत असल्याने, संबंधित विभागाने बस थांबा शेडची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे.
Media Id: PNE22S34796

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top