पाच हजार ६५० थकबाकीदारांची वीज खंडित पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती; महावितरणची आर्थिक घडी विस्कटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच हजार ६५० थकबाकीदारांची वीज खंडित

पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती; महावितरणची आर्थिक घडी विस्कटली
पाच हजार ६५० थकबाकीदारांची वीज खंडित पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती; महावितरणची आर्थिक घडी विस्कटली

पाच हजार ६५० थकबाकीदारांची वीज खंडित पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती; महावितरणची आर्थिक घडी विस्कटली

sakal_logo
By

पिंपरी, ता ११ : वीजबिलांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून पुणे परिमंडळ अंतर्गत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू केली आहे. यामध्ये गेल्या महिन्याभरात पिंपरी-चिंचवड शहरातील पाच हजार ६५० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
वारंवार आवाहन व विनंती करून देखील भरणा होत नसल्याने वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. सद्यःस्थितीत पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच हवेली ग्रामीण भागासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी व वेल्हे तालुक्यातील घरगुती सात लाख ३७ हजार ३६० ग्राहकांकडे १५७ कोटी ४६ लाख, वाणिज्यिक एक लाख ८०२ ग्राहकांकडे ५३ कोटी ८३ लाख व औद्योगिक १६ हजार ४६७ ग्राहकांकडे २५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

गेल्या महिन्याभरात पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ४० हजार ८५३ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. यामध्ये पुणे शहरातील २१ हजार ३४७, पिंपरी-चिंचवड शहरातील पाच हजार ६५० तसेच हवेली ग्रामीण, मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ व खेड तालुक्यातील १३ हजार ८५६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला. या मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. तसेच या वीजजोडण्यांची सायंकाळनंतर देखील विशेष तपासणी करण्यात येत आहे. या दोहोंमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
तसेच थकबाकीदार ग्राहकांकडे बिलाची थकीत रक्कम किती आहे. हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलाचा नियमित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले आहे. घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top