स्मारकाचे सुशोभीकरण तत्काळ करण्याची मागणी

स्मारकाचे सुशोभीकरण तत्काळ करण्याची मागणी

पिंपरी, ता. ११ : आद्यक्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके स्मारकाचे सुशोभीकरण तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी एमआयएमआयएम शहाराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्यावतीने महापौरांकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे,‘‘ पिंपरी-चिंचवड महापालिका ही महापुरुषांच्या विचारावर चालणारी आहे. अनेक महापुरुषांचे स्मारक आपल्या शहरात आहेत. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे चिंचवड स्टेशन येथे अर्धपुतळे बसवण्यात आलेले असून, त्या ठिकाणी अनेक नागरिक अभिवादनासाठी येत असतात. मागील अनेक दिवसांपासून या स्मारकांचे सुशोभीकरण डागडुजीचे कामकाज सुरू आहे. परंतु, अद्यापपर्यंत ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या परिसरात तत्काळ सुशोभीकरण करून, दोन्ही क्रांतिकारकांवर मेघडंबरी बसवण्यात यावी. दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com