Pune Corporation five illegal buildings colapse
Pune Corporation five illegal buildings colapsesakal

पिंपरी : धोकादायक इमारती होणार जमीनदोस्त

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यालयातील गेस्ट हाउससह (अतिथी गृह) धोकादायक दोन इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.
Summary

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यालयातील गेस्ट हाउससह (अतिथी गृह) धोकादायक दोन इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.

पिंपरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यालयातील गेस्ट हाउससह (अतिथी गृह) धोकादायक (Dangerous) दोन इमारती (Building) जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. एमआयडीसी कार्यकारी अभियंता यांनी इमारतीमधील रहिवाशांना नोटिसा बजावून या इमारती सील केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी घरे रिकामी केली असून, लवकरच या इमारती पाडल्या जाणार असल्याचे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune Corporation five illegal buildings colapse
तू माझ्यासोबत राहशील का? म्हणत केला विनयभंग; आरोपीला ७२ तासांत शिक्षा

तळेगाव, पिंपरी-चिंचवड, चाकण या उपकार्यालयांचे कामकाज चिंचवड कार्यालयांमधून चालते. तसेच, या भागात विद्युत व यांत्रिकी विभागाचे देखील कामकाज सुरू आहे. त्याचप्रमाणे, काही प्रमाणात अकाउंटिंगची कामे देखील याच ठिकाणांहून सुरू आहेत. सध्या शहरात अनेक धोकादायक इमारती तग धरुन आहेत. परंतु, या धोकादायक इमारती सर्वेक्षणातच अडकून पडल्या आहेत. चिंचवड हद्दीतील पाडणाऱ्या इमारतींची यादी मात्र एमआयडीसीकडून प्रसिद्ध केली गेलेली नाही.

पावसाळ्यात या इमारतींचा धोका मोठ्या प्रमाणात संभावतो. मात्र, या इमारतींवर बुलडोझर कधी फिरणार हे अद्यापपर्यंत निश्चित नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com