राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्यावतीने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उत्साहात साजरी झाली.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने सलग चौथ्यावर्षी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मराठवाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्रिवेणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. मोहन पवार व डॉ. अश्विनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अदिती कुलकर्णी, डॉ. सदाशिव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिर पुढील तीन दिवस त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी येथे सुरु राहणार आहे.
शिबिरामध्ये महिलांसंबंधित सर्व आजारांवर उपचार करून संभाजी ब्रिगेडच्यावतीने पाच लाख रुपयांपर्यंत मोफत शस्त्रक्रियेचा खर्च करणार असल्याचे संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी सांगितले.
पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते यांनी मनोगत व्यक्त केले. मराठा सेवा संघांचे गजानन आढाव यांनी जिजाऊंच्या कार्याला उजाळा दिला. जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, शहर उपाध्यक्ष संजय जाधव, बीएसपीचे महेश कांबळे, राजेंद्र पवार तसेच छावाचे गणेश सरकटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन शहर आघाडीच्यावतीने लांडेवाडी भोसरी येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. शहर अध्यक्ष देवेंद्र तायडे, शहर उपाध्यक्ष राहुल बनसोडे, महिला आघाडी अध्यक्षा लता रोकडे, युवा आघाडी अध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व युवा आघाडी पिंपरी-चिंचवड शहराचे सर्व शहर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top