महापालिकेतील दोन उपायुक्त, चार सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

महापालिकेतील दोन उपायुक्त, चार सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी, ता. १२ ः महापालिकेतील दोन उपायुक्त व चार सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्यांचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी काढला. सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे निवडणूक विभाग कायम ठेवून प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे. प्रशासनाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची बदली उद्यान विभागात केली आहे. सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडील पशुवैद्यकीय विभाग काढून करसंकलन विभागाच्या उपआयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे दिला आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागही त्यांच्याकडेच सोपवला आहे. मात्र, देशमुख यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग कायम ठेवला आहे. प्रशासनातील राजेश आगळे यांच्याकडे केवळ इ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी ठेवली आहे. प्रशासनातील सहायक आयुक्त वामन नेमाणे यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभाग सोपवला आहे. तसेच, देशमुख यांच्याकडे चिंचवड विधानसभा आणि झगडे यांच्याकडे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी पदाचीही जबाबदारी सोपवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com