ईपीएफचे संकेतस्थळ वारंवार डाऊन

ईपीएफचे संकेतस्थळ वारंवार डाऊन

पिंपरी, ता. १३ : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयाचे संकेतस्थळ वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे, कोरोना काळात ऑनलाइन पीएफची कामे करणारे नागरिक हैराण झाले आहेत. विविध कामांसाठी नागरीकांना पीएफ कार्यालयात जावे लागते. परंतु, डिजिटल सोईसुविधा घरबसल्या उपलब्ध असूनही त्याचा फायदा नागरिकांना होत नाही. दिवसभर https://www.epfindia.gov.in/ हे संकेतस्थळ वारंवार डाऊन होत असल्याने नाइलाजास्तव नागरीकांना आकुर्डीतील ईपीएफ कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे.
खात्यातून पैसे काढणे, नॉमिनीचे नाव लावणे, आधार व बॅंक खाते लिंक करणे, कोरोना भत्ता व लाभ मिळवून देणे, पीएफचा बॅलन्स तपासणे, कंपन्यांच्या पीएफची कागदपत्रे अपलोड करणे, सेवानिवृत्तीधारकांची पेन्शन, विधवा महिलांचा लाभ, ई निरीक्षण प्रणालीद्वारे काम करणे अशा विविध सेवांसाठी नागरिक पीएफ खात्याद्वारे काम करत आहेत. परंतु, संकेतस्थळ अवघे एक ते दोन मिनीट प्रक्रियेत राहत असून पुन्हा हॅंग होत आहे. ‘वेबसाइट वर पोचू शकत नाही’ असा संदेश वारंवार येत आहे. त्यामुळे, नागरिक कात्रीत सापडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून संकेतस्थळ वारंवार डाउन होत असल्याने, नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com