दिलासादायक! पिंपरी शहरातील कोरोना संसर्ग घटतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients
दिलासादायक! पिंपरी शहरातील कोरोना संसर्ग घटतोय

दिलासादायक! पिंपरी शहरातील कोरोना संसर्ग घटतोय

पिंपरी - जानेवारीच्या प्रारंभापासूनच कोरोना संसर्ग (Corona Infection) वाढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या आटोक्यात येऊ लागली आहे. संसर्गाचे प्रमाण कमी होत असून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या चार दिवसांत नऊ हजार ४२५ नवीन रुग्ण आढळले तर, त्यापेक्षा दुप्पट अर्थात १८ हजार ५१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे.

कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्ग झालेले रुग्णही शहरात आढळत आहेत. त्या पार्श्‍वभूमिवर महापालिकेने आठ रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रात २४ केंद्रांवर ॲंटिजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्याची व्यवस्था केली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी, लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक नव्वद टक्क्यांवर होती. त्या खालोखाल सौम्य लक्षणे असलेली व काहीही त्रास नसलेल्या रुग्णांची संख्या राहिली आहे. गंभीर व व्हींटेलेटरवरील रुग्णसंख्या दोन ते तीन टक्क्यांच्या दरम्यान राहिली आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांना गृहविलगीकरणातच ठेवले जात आहे. मात्र, त्यांच्याशी सारथी हेल्पलाइनच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे.

हेही वाचा: मोटार व कंटेनर अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू; एकाच परिवारातील चौघांचा समावेश

जानेवारी महिन्याचा विचार केल्यास २६ जानेवारीपर्यंत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. बुधवारी (ता. २६) एकूण रुग्णसंख्या २८ हजार ५८० होती. त्यातील ५६६ जण रुग्णालयात उपचार घेत होते. २८ हजार ५८० जण गृहविलगीकरणात होते. पुढील चार दिवसांत नऊ हजारांवर रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रविवारी (ता. ३०) एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४७४ पर्यंत खाली आली. त्यातील ५०० जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. १८ हजार ९७४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top