
श्री मंगलमूर्तींची माघी यात्रा साध्या पद्धतीने
श्री मंगलमूर्तींची माघी यात्रा
यंदाही साध्या पद्धतीने होणार
पिंपरी, ता. ३१ : ओमिक्रॉन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री मंगलमूर्तींची माघी यात्रा यंदा साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. श्री मंगलमूर्तींच्या पालखीचे देव गाडीतून गुरुवारी (ता. ३) मोरगांवकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
श्री मंगलमूर्तींची मूर्ती वर्षांतून दोन वेळा चिंचवड येथून श्री क्षेत्र मोरगावला पालखीतून व रथातून नेण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी केली जाणार आहे. रथाऐवजी देवगाडीतून ही यात्रा होणार आहे. यावर्षी कालावधीही कमी करण्यात आला असून ३ ते ८ फेब्रुवारी अशा सहा दिवसांच्या कालावधीत यात्रा होईल. गुरुवारी (ता. ३) दुपारी चार वाजता चिंचवडहून मोरगावकडे प्रस्थान होणार असून, मंगळवारी (ता. ८) देव गाडीतून यात्रा परत येईल. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार यात्रा पार पडणार असल्याचे मंदार महाराज देव यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..