makar sankranti
makar sankrantiSakal

कोरोनामुळे मकर संक्रांत ऑनलाइन शुभेच्छांवरच

संक्रांतीच्या सणाला कोरोनामुळे ग्रहण लागले

पिंपरी : जानेवारी महिन्यात येणाऱ्या पहिल्याच महिलांच्या सणाला कोरोनामुळे ग्रहण लागले आहे. कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने यावर्षी अनेक हौशी महिलांनी घरातच तुळशीसमोर ओवसून मकर संक्रांत साजरी केली. तसेच, घरातील देवी-देवतांसमोरच महिलांनी एकत्रित येऊन एकमेकींना वाण दिले. जमाव बंदीचा आदेश असल्याने काही अंशी महिलांनी घराजवळील मंदिर परिसरात व गाभाऱ्याच्या समोर दर्शन घेऊन ओवसले. ऑनलाइन शुभेच्छांवरच सर्वाधिक संक्रांतीचा आनंद कुटुंबीयांसह सर्वांनी घेतला.(due to corona makar sankranti on online wishes only)

makar sankranti
चोरांचा मटणावर डल्ला, मतदारांनी अंड्यांवर भागवली भूक

महिलांना गेल्या दोन वर्षांपासून सणवार साजरे करण्यावर मुरड घालावी लागली आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर अनेक महिलांनी काळ्या रंगाच्या साड्या हौसेने घातल्या. बऱ्याच नववधूनी पहिली संक्रांत असूनही घरातच साजरी केली. त्यामुळे अनेक जणींना साज-श्रृंगार करता आला नाही. तसेच, माहेर जाण्याचा बेतही अनेकजणींचा हुकला. सोसायटी परिसरातील व बंगलो असलेल्या ठिकाणी महिलांनी एकत्रित येऊन चार ते पाच जणींमध्ये मिळून ओवसले. हळदी कुंकूचे वाण एकमेकींना दिले. नोकरदार महिलांनी घरातच देवी-देवतांना नैवेद्य दाखविला. घरोघरी पुरण-पोळी सण साजरा करून अनेकांनी जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच, अनेक महिलांनी आजपासून हळदी कुंकवाला बोलवताना चार-चार जणींच्या ग्रुपने मिळून जाण्याचा बेत आखला आहे. एकमेकांना तिळगूळ देण्याचेही अनेकांनी टाळले आहे. तिळगूळ वाटप करतानाही बऱ्याच जणांनी तोंडावर मास्क आणि अंतर ठेवून तिळगुळ वाटपाचा आस्वाद घेतला. शक्यतो, घरात बनविलेल्या तिळाच्या वड्या व तिळगुळाचा वापर केल्याचे दिसून आले. परंतु, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने अनेकांना आनंदावर मुरड घालावी लागली. संक्रांतीच्या दिवशीही अनेकांनी कोरोनाचे सावट लवकर दूर होवू दे हीच मनोमन प्रार्थना केली.

makar sankranti
मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

पर्यावरण पूरक मकरसंक्रांत व हळदीकुंकू वाण
संक्रांत हा तसा शेतीसंबंधी उत्सव कृषिप्रधान देश असल्याने अधिक महत्त्व आहे. या काळात महिला हळदी-कुंकू साजरे करतात. ही परंपरा पहिल्यापासून आजही शहरात जपली जात आहे. परंतु, हे वाण अनेक पर्यावरणप्रेमींनी धान्य व उपज हे एकमेकींना वाण दिले. अलीकडच्या काळात या वाणांची जागा प्लास्टिकच्या वस्तूंनी घेतली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यावरण पूरक पद्धतीने वाण म्हणून पर्यावरण पूरक वस्तू आयुर्वेदिक रोपे, कापडी पिशव्या अनेकजणी देत आहेत. रोपांमध्ये शतावरी, पानफुटी, वाळा, बर्गो मिंट, तुळस, स्टेविया, हाडजोड, अडुळसा, ओवा, गुग्गुळ, लाजाळू, वेखंड, गुळवेल, निरब्रह्मी, मांडुकपर्णी,लाल गुंज, पांढरी रुई, रान लसूण, इन्शुलिन देशी रोपांची झाडे देत आहेत. अनेक जणी कुंड्यासहित रोपे तसेच बिया भेट देताना दिसून येत आहेत. (Sankranti is an agricultural festival it is more important as it is an agricultural country)

makar sankranti
बाळूपाटलाच्या वाडीतील युवकाचा मारहाणीत मृत्यू 

सिंधी बांधवांची लाल लोहरी साजरी
विश्व सिंधी सेवा समाजाच्या वतीने महिलांनी लोहरी (शेकोटी) पेटवून सण मोठ्या आनंदात साजरा केला. यामध्ये तीळ, रेवडी, शेंगा वस्तू अर्पित केल्या. सौभाग्य, समृद्धी याचं ते प्रतीक मानलं जातं. नृत्य-संगीत लोहरीभोवती सादर केले. लोहरी हा सण गाण्याशिवाय अपूर्ण मानला जातो. मोजक्या महिलांनी एकत्रित येऊन पारंपारिक लोकगीते गायली. या सणाच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती सण साजरा केला जातो.

makar sankranti
कोरोना काळात रेशनने गरीब, गरजूंची भागवली भूक ! 

तमीळ बांधवांचा पोंगल साजरा
शहरात अनेक तमिळी बांधव वास्तव्यास आहेत. त्यांनी देखील सण घरातच साजरा केला. एकमेकांना सदिच्छा दिल्या. पोंगल सणाच्या निमित्ताने सर्वजण सकाळी एकत्र येतात. सूर्याचे आभार मानतात. विशेष म्हणजे, या दिवशी शेतकामामध्ये उपयोगी असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. नववर्षाचे स्वागत म्हणून सूर्यपूजा केली जाते. पोंगल चार दिवस साजरे केला जातो, या दिवशी सर्व प्रकारचा कचरा जाळला जातो. सणासुदीला चांगले पदार्थ तयार केले. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा व तिसऱ्या दिवशी गुरांची पूजा केली जाते आणि चौथ्या दिवशी कालीजीची पूजा केली जाते. सणाच्या दिवशी घरांची खास साफसफाई करून नवीन वर्षाचे स्वागत केले गेले. दक्षिण भारतात पोंगल या सणाला विशेष महत्त्व आहे. या
वर्षी हा सण म्हणजेच मकर संक्रांतीपासून सुरू होतो.(Makar Sankranti news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com