विवाहिता छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहिता छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल
विवाहिता छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

विवाहिता छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ : साखरपुड्याला खर्च न केल्याने तसेच दोन गुंठे जमीन नावावर करण्यासाठी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती ऋषिकेश पोपट निकम, सासरा पोपट निकम व एक महिला (सर्व रा. पिंपळे सौदागर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला घरातील काम येत नाही, साखरपुड्याचा खर्च वाचवला, असे सतत टोचून बोलत. तसेच ‘माहेराहून अजून भांडी घेऊन ये, तुम्ही लोकांनी साखरपुड्याला खर्च केला नाही, माहेरी जाऊन पैसे घेऊन ये,’ असे फिर्यादीला सारखे बोलत. त्यांना अपमानित करीत. आमच्या नावावर दोन गुंठे जमीन कर, असे म्हणतही फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. धमकी दिली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top