महिलेकडून पैसे उकळून फोटो शेअर करण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेकडून पैसे उकळून फोटो शेअर करण्याची धमकी
महिलेकडून पैसे उकळून फोटो शेअर करण्याची धमकी

महिलेकडून पैसे उकळून फोटो शेअर करण्याची धमकी

sakal_logo
By

महिलेकडून पैसे उकळून
फोटो शेअर करण्याची धमकी

पिंपरी, ता. १५ : लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक सबंध ठेवले. वेगवेगळी कारणे सांगत तिच्याकडून पैसे उकळले. तसेच महिलेला तिचे फोटो शेअर करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक आत्माराम शेंडगे (रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपीची २०१९ मध्ये मेट्रोमेनी ॲपवरून ओळख झाली. त्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीशी शरीर संबंध ठेवले. फिर्यादीला वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून रोख एक लाख ९० हजार रुपये व ऑनलाइनद्वारे एक लाख ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर एकेदिवशी फिर्यादी घरी नसताना चावीने कुलूप उघडून आरोपी घरात गेला. कपाटातील तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने न कळत घेऊन जाऊन फिर्यादीची फसवणूक केली. तसेच ‘तुझे फोटो माझ्याकडे आहेत. ते मी तुझ्या घरच्यांना शेअर करेल’ अशी धमकी दिली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top