आयटी युवतीने घेतलाय मराठी भाषेचा वसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटी युवतीने घेतलाय मराठी भाषेचा वसा
आयटी युवतीने घेतलाय मराठी भाषेचा वसा

आयटी युवतीने घेतलाय मराठी भाषेचा वसा

sakal_logo
By

पिंपरी, ता.२६ ः आयटीयन्सला म्हटलं की इंग्रजीत फाडफाड बोलणारी व्यक्ती. जिला मराठीचे गंध ही नसेल, असा आपला समज. पण याला एका पिंपळे गुरवमधील नीलाक्षी सालके ही आयटी युवती अपवाद ठरली आहे. तिने मराठी भाषा व त्यातील गोडवा अबाधित ठेवण्यासाठी मराठी भाषेचा ऑनलाइन प्रसाराचा वसा घेतला आहे. ती इंग्रजी माध्यमाच्या चिमुरड्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करीत आहे.
लॉकडाउनमध्ये अनेक आयटी कंपनीमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती अवलंबिली गेली. परदेशी नागरिक, संस्था तसेच त्या कंपनीच्या सेवा घेणाऱ्या यांच्या संबंधित देशातील वेळेनुसार संवाद साधावा लागतो, याचा उपयोग करीत आपल्या मराठी भाषेचा आपल्या नवीन पिढीला विसर पडू नये या कल्पनेतून नीलाक्षीने ‘मातृगंध मराठी वाचन कट्टा’ हा व्हॉटसग्रुप तयार केला. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी या ग्रुप मधील सहभागी चिमुरड्यांना ‘आम्ही चालवू वारसा’ या उपक्रमातून मातृभाषेतील विविध शब्दांची ओळख करून देते. ज्यामध्ये एक शब्द देवून त्यानुसार गोष्ट तयार करणे, विविध मराठी पुस्तकांतील परिच्छेदांचे वाचन करणे असे उपक्रम राबवीत आहे.
इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी शब्दांची ओळख व्हावी, त्यांचे वाचन कौशल्ये विकसित व्हावे, या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे आत्ता १०० ऑनलाइन सेशन संपन्न होत आहेत. काही काळ परदेशात वास्तव्यास राहून सुद्धा आपल्या आजूबाजूच्या भाषेचा प्रभाव न पडता ती मराठीवर प्रेम करत आहे. ऐतिहासिक वारसा, ठिकाणे, थोर क्रांतिकारक यांची माहिती मराठी भाषेतून देत त्यातील भाषेचे पैलू समजावण्याचा प्रयत्न नीलाक्षी करत आहे.

‘‘प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या हेतूने आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण अथवा नोकरी करताना जरी आपण इतर कोणत्याही भाषेत संवाद साधत असलो तरी आपल्या भाषेचा गोडवा हा वेगळा आहे. सर्वांनीच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन केले पाहिजे. नव्या पिढीला आपल्या मातृभाषेची ओळख राहणे गरजेचे आहे. सहभागी पालकांचा सहभाग व त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रोत्साहन देतात. मी हे काम आवड म्हणून करत आहे.’’
-नीलाक्षी सालके, पिंपळे गुरव

फोटो -PNE22S45553

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top