आरटीई प्रवेशासाठी मदत केंद्रे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेशासाठी 
मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेशासाठी मदत केंद्रे सुरू

आरटीई प्रवेशासाठी मदत केंद्रे सुरू

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये सुरू असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील दहा शाळांमध्ये मदत केंद्रे उभारली आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना लागणारी आवश्यक ती मदत पुरविण्यात येत आहे. मदतीसाठी विभागाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांचा शाळेत प्रवेश घेण्यासाठी मदत होणार आहे.

आरटीई कायद्यानुसार शहरातील १७० शाळांची नोंदणी झालेली आहे. या शाळांमध्ये एकूण ३ हजार ३२४ इतक्‍या जागा २५ टक्के प्रवेशासाठी राखीव ठेवल्या आहेत.www.rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज गुरुवारपासून (ता. २४)भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सोयीसाठी महापालिका शिक्षण विभागाने १० मदत केंद्राची सोय उपलब्ध केली आहे. दरम्यान, काही ठिकाणी सायबर कॅफेमध्ये वंचित घटकांतील पालकांना अर्ज करता येत नाहीत. प्रवेशासाठी अर्जात पत्ता भरताना गुगल मॅपद्वारे अंतर मोजण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी पत्त्यानुसार घर मॅपवर दाखवले जात नाही. त्यामुळे अर्ज पुढे भरताच येत नाही, अशा विविध तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत. या केंद्रांवर पालकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रवेश प्रक्रियेची आवश्यक ती माहिती देण्यात येत आहे.

येथे आहेत मदत केंद्र
महापालिका वसंतराव पाटील मुले/मुलींची शाळा (आकुर्डी), कल्पना इंग्लिश मीडियम स्कूल (निगडी), जी. एस. के. इंग्लिश मीडियम स्कूल (जाधववाडी), सिद्धेश्‍वर इंग्लिश मीडियम स्कूल (भोसरी), किड्‌स पॅरेडाईज इंग्लिश मीडियम स्कूल (चऱ्होली), इनफंट जिझस प्रायमरी स्कूल (कासारवाडी), डेलमॉन्ट इंग्लिश मीडियम स्कूल, एस. पी. स्कूल (वाकड), सेंट मायकल ज्युनिअर ऑर्किड स्कूल (पिंपळे गुरव), बी. टी. मेमोरिअल स्कूल (काळेवाडी) या केंद्रांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..