आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा चिंचवडमध्ये वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा चिंचवडमध्ये वर्धापनदिन उत्साहात
आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा चिंचवडमध्ये वर्धापनदिन उत्साहात

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा चिंचवडमध्ये वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः चिंचवड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, नगरसेवक सुरेश भोईर, राजाभाऊ गोलांडे, संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर खेडकर, पदाधिकारी प्रिया जोशी, अशोक नागणे, आर. आर. कुलकर्णी, रवींद्र झेंडे, मार्गदर्शक अशोक कपोले आदी उपस्थित होते. ‘आनंद २०२२’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. मधुसूदन घाणेकर आणि प्रशांत राजे यांचे एकपात्री प्रयोग झाले. प्रा. डॉ. सुशीलकुमार लवटे यांचे ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा’ विषयावर मार्गदर्शन झाले. सभासदांनी नृत्य, गायन, अभिनय इत्यादी कलागुण सादर केले. स्वाती काकडे, आशा कुलकर्णी, शालिनी कुलकर्णी, प्रा. डॉ. किरण गंगापूरकर, संजय देशपांडे, कविता कोल्हापुरे, प्रदीप वळसंगकर, विजय राजपाठक यांनी संयोजन केले. उमा पाडुळकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनंदा माटे यांनी आभार मानले. वंदना बोरकर यांनी पसायदान सादर केले.