
जीवनावश्यक वस्तू ‘झिरो जीएसटी’त ठेवा फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्सची मागणी
पुणे, ता. २५ : काही वस्तूंवर ‘जीएसटी’चे दर वाढविण्याचे नुकतेच केंद्र सरकारने ठरविले आहे. त्याबाबत राज्यांकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, गूळ, पापड व इतर वस्तूंवर जीएसटी वाढविण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. वास्तविक गेले अनेक वर्ष जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी नसावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. तर गेल्या दिवसांत महागाई खूप वाढलेली आहे. जीएसटी वाढल्यास महागाईत आणखी भर पडेल. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू झिरो जीएसटीमध्ये ठेवाव्यात, अशी मागणी दि फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्सने केली आहे.
जीएसटीतून मिळणारे उत्पन्न सध्या वाढले आहे. त्याचा विचार सरकारने करावा. शासनाने वायफट खर्चावर बंधन आणल्यास जीएसटी किंवा अन्य कोणतेही कर वाढविण्याची गरज नाही. खोट्या लोकप्रियतेसाठी वस्तू व सेवांचे फुकट वाटप करणे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये चुकीची सवलत देणे देखील शासनाने थांबविणे गरजेचे आहे, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
जीवनावश्यक वस्तूंवरील ‘जीएसटी’मध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्यात येऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय जीएसटी कमिटी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..