बैलगाडा शर्यत
बैलगाडा शर्यतTeam eSakal

भोसरीतील बैलगाडा शर्यत अपरिहार्य कारणांमुळे रद्द

भोसरी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त कोरोना काळानंतर होणाऱ्या बैलगाडा शर्यतीची उत्सुकता भोसरीकरांसह पंचक्रोशीतील गावांना होती.

भोसरी : येथील श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त सोमवारी (ता. १८) संध्याकाळी घेण्यात येणारी बैलगाडा शर्यत काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती भोसरी ग्रामस्थ उत्सव समितीद्वारे देण्यात आली. मात्र, उत्सवानिमित्त घेण्यात येत असलेल्या कुस्त्या, चक्री भजन, पारंपरिक पूजा, तमाशा आदी सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत होणार असल्याची माहितीही समितीद्वारे देण्यात आली.

भोसरी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त कोरोना काळानंतर होणाऱ्या बैलगाडा शर्यतीची उत्सुकता भोसरीकरांसह पंचक्रोशीतील गावांना होती. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे ही बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष पंडित गवळी यांनी दिली. भैरवनाथ उत्सवानिमित्त कुस्तीच्या आखाड्यात ग्रामस्थांद्वारे शेवटच्या निकाली कुस्तीला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याने उत्सवात कुस्त्यांचे आकर्षण असणार आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. १६) भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त रात्री नऊ वाजता छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. भैरवनाथ मंदिरात भैरवनाथ महाराजांची आरती करून छबिन्याच्या मिरवणुकीला सुरवात झाली. भोसरीतील गव्हाणे, लांडगे, फुगे आदी तालीम मंडळांच्या ढोल लेझीम पथकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर, लक्ष्मी मंदिर ते पुन्हा भैरवनाथ मंदिर अशी पालखीची मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी नागरिकांनी भैरवनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com