पिंपरीत विजेच्या खांबांवर किऑक्स अन् फ्लेक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Keyoax
विजेच्या खांबांवर किऑक्स अन् फ्लेक्स

पिंपरीत विजेच्या खांबांवर किऑक्स अन् फ्लेक्स

पिंपरी - आळंदी-देहू रस्त्यावरील डुडुळगाव ते मोशीपर्यंतच्या रस्ता दुभाजकांतील विजेच्या खांबावर (Electric Poll) छोट्या जाहिरातींचे फलक (Advertise Board) अर्थात किऑक्स (Keyoax) लावलेले होते. त्यांवर गेल्या पंधरवाड्यात कारवाई (Crime) करून सर्व किऑक्स काढण्यात आले. मंगळवारी (ता. २९) पुन्हा लावलेले आढळले. अशा अनधिकृत फलकांमुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत असून शहराचे विदृपीकरण होऊन सौंदर्यास बाधा येत आहे.

डुडुळगाव ते मोशी, मोशी ते उपबाजार समिती चौक, उपबाजार समिती चौक ते जाधववाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्पाइन रस्त्यावरील जाधव सरकार चौक ते कुदळवाडी कॉर्नर आणि कुदळवाडी कॉर्नर ते टेल्को रस्त्यावरील केएसबी चौक या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर अनधिकृत फलक मोठ्या प्रमाणात आढळून आले. महापालिकेच्या अधिकृत होर्डिंग्ज सांगाड्यांचीही पाहणी केली. त्यात एका सांगाड्यावर दोन ते चार होर्डिंग्ज, दोन्ही बाजूला होर्डिंग्ज लावलेले आढळले. डुडुळगाव ते मोशीतील शिवयोद्धा चौकापर्यंत असलेल्या चार होर्डिंग्जची दुरावस्था झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या वादळामुळे फाटलेल्या जाहिरात फलकाची लक्तरे तशीच लोंबकळत असून शहर सौंदर्याला बाधा आणत आहे.

धोकादायक अधिक

महापालिकेने लोखंडी सांगाडे उभारून जागा भाडेतत्त्वाने दिल्या आहेत. काही जण वाढदिवस शुभेच्छा, श्रद्धांजली सभा, शोकसंदेश, लग्नसमारंभ यांची माहिती देण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात लाकडी सांगाड्या उभारतात. किंवा लाकड्या फळ्या किंवा चौकोनी लोखंडी पाइपचा वापर करून सांगाडा करतात. ते रस्त्यावर एखाद्या खांबाच्या आधाराने उभा करतात. असे फ्लेक्स हवेने पडून धोकादायक ठरू शकतात. घरांच्या छतांवरसुद्धा होर्डिंग्जचे सांगाडे काहींनी उभारले आहेत. मात्र, ते धोकादायक ठरू शकतात.

अशी आहे वस्तुस्थिती

- केएसबी चौक ते कुदळवाडी सर्कलपर्यंतच्या ३९ खांबांवर छोटे फ्लेक्स (किऑक्स) आहेत

- कुदळवाडी सर्कल ते जाधव सरकार चौकापर्यंत दोन्ही बाजूमिळून ६० खांबांवर फ्लेक्स आहेत

- एमएनजीएल पंप परिसरात २३ खांबांवर प्रत्येकी दोन प्रमाणे विशिष्ट रंगाचे झेंडे बांधले आहेत

- जाधववाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोशी उपबाजार चौकापर्यंत कुठेच फ्लेक्स नाही

- मोशी उपबाजार ते गावठाणापर्यंत नाशिक महामार्गाने लहान-मोठे ४३ होर्डिंग्ज आहेत

- मोशी ते डुडुळगावपर्यंत १३८ विद्युत खांबांवर किऑक्स आकारातील फ्लेक्स लावले आहेत

- गृहप्रकल्प, प्लॉटिंग, मॉल्स, शोकसंदेश, कोचिंग क्लासेस, स्कूल, लग्नसमारंभ संदर्भातील प्लेक्स

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top