मोरवाडी आयटीआयमध्ये उद्या रोजगार मेळावा

मोरवाडी आयटीआयमध्ये उद्या रोजगार मेळावा

पिंपरी, ता. १८ ः बेरोजगार युवक-युवतींसाठी मोरवाडी येथील महापालिका औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात बुधवारी (ता. २०) सकाळी १० वाजेपासून रोजगार भरती मेळावा आयोजित केला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक यांच्या सहकार्याने मेळावा होईल. संबंधितांनी https://forms.gle/sePffuPoG42qEtcg9 या लिंकवर माहिती भरून नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व महापालिकेने आयोजित केले होते. त्याअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) यांच्यातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी ११ ते १५ एप्रिल दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण शिबिर झाले. परदेशातील नोकरीच्या संधी आणि शैक्षणिक मार्गदर्शन, महिला कौशल्य विकास उद्योजकता आदी विषयांचा त्यात समावेश होता. आता बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com