
एकम टेबल टेनिस अकॅडेमीचा रहाटणीत गुणदर्शन सोहळा
पिंपरी, ता. १ : एकम टेबल टेनिस अकॅडेमीचा कौशल्य व गुणदर्शन सोहळा रहाटणी येथे झाला. कार्यक्रमात ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांनी टेबल टेनिसमधील विविध कौशल्याचे प्रदर्शन केले. त्यानंतर डॉ. देसाई यांचे फिजिओ थेरपी ह्या विषयावर भाषण झाले. त्यात त्यांनी व्यायाम व खेळतांना घ्यावयाची काळजी समजावून सांगितली.
एकमचा माजी विद्यार्थी गोकुळ कृष्णनने (तामिळनाडू रँक ५) अनुभव सांगितला. महाराष्ट्र रॅंक एकची स्वप्नाली नराळे हिने तिचा आजपर्यंतचा प्रवास सांगितला.
संस्थापक सुबोध कोर्डे यांनी टेबल टेनिसमध्ये माईंड कंट्रोल, फिजिकल फिटनेस व डाएटचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांसाठी तीन स्तराची शिष्यवृत्ती जाहीर केली. शिष्यवृत्ती ५ हजार रूपये ते १ हजार रुपये अशी एक लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागी झालेले सर्व मुले, गोकुळ व स्वप्नाली यांना विजय गायधनी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..