Ramdas Athawale
Ramdas AthawaleSakal

पिंपरी : आरपीआय महापालिकेची आगामी निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढणार?

पिंपरी महापालिकेची आगामी निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ती निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) एकत्रित लढणार आहे.
Summary

पिंपरी महापालिकेची आगामी निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ती निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) एकत्रित लढणार आहे.

पिंपरी - महापालिकेची आगामी निवडणूक (Municipal Election) सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ती निवडणूक भारतीय जनता पक्ष (BJP) आणि रिपब्लिकन पक्ष (RPI) (आठवले गट) एकत्रित लढणार आहे. विजयी झाल्यानंतर ‘पद वाटपाचा पुणे फार्म्युला’ वापरणार आहे, असे संकेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी रविवारी (ता. ३) दिले. निवडणूक आयोगाकडे पक्षाची नव्याने नोंदणी केली असून, स्वतंत्र चिन्हाची मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, तोपर्यंत स्वतंत्र चिन्ह न मिळाल्यास आरपीआय २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर लढणार की आयोगाकडून मिळेल, त्या चिन्हावर लढणार याची उत्सुकता आहे. असे असले तरी, ‘कमळ’ चिन्ह घेऊनच निवडणूक लढवायची असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचे रविवारी त्यांच्याशी बोलताना जाणवले.

पिंपरी-चिंचवड शहर हे रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे. येथील प्रत्येक भागात, वाडीवस्तीत रिपब्लिकनची ओळख आहे. पक्षाचा कार्यकर्ते तिथे राहत आहेत. त्यामुळे पक्षाला मोठे पाठबळ मिळत असल्याचा आठवले यांचा दावा आहे. २०१७-२०२२ या पंचवार्षिक कार्यकालात महापालिकेत पक्षाचा एकही सदस्य नव्हता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पक्षाला भाजपने तीन जागा देऊन तिथे उमेदवार उभे केले होते. मित्र पक्ष भाजपचे ‘कमळ’ चिन्ह घेऊन त्यांनी निवडणूक लढवली.

त्यातील एकच उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ निवडून आले होते. दोन उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यातील दापोडीतून लढलेल्या माजी नगरसेविका व पक्षाच्या महिला आघाडी सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे यांचा अवघ्या ७९४ मतांनी पराभव झाला होता. त्यांना सात हजार ५०२ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवाराला आठ हजार २९६ मते मिळाली होती. या वेळी भाजप व रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांनी थोडा जोर लावला असता तर, त्या विजयी झाल्या असत्या. महापालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्या लढल्या. पण, भाजपच्या ‘कमळ’ऐवजी त्यांचे शिलाई मशिन चिन्ह होते. अवघ्या बावीसशे मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यांचे चिन्ह ‘कमळ’ असते तर सहज विजयी होऊ शकल्या असत्या असे आजही बोलले जात आहे. आता महापालिकेच्या आगामी निवडणुकीत १३९ पैकी ३९ जागा भाजपला मागणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे. पण, यात कमी-जास्त होऊ शकते, असे लवचिकतेचे सुतोवाचही त्यांनी दिले आहेत. पण, निवडून आल्यास पुण्याप्रमाणे उमहापौरपदही मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात रिपब्लिकन पक्ष काय भूमिका घेतो, यावरही सत्तेची पुढील गणिते अवलंबून आहेत.

पुणे फार्म्युला काय होता?

पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला आठ जागा दिल्या होत्या. मात्र, निवडणूक चिन्ह ‘कमळ’ होते. त्यातील पाच जागांवर विजय मिळवून पाच वर्षांसाठी उपमहापौरपदही पक्षाला मिळाले होते. तोच फार्म्युला काहीशा फरकाने पिंपरी-चिंचवडमध्येही राबविला जाणार आहे. निवडून आल्यानंतर अडीच वर्ष महापौरपद आणि अडीच वर्ष उपमहापौरपद मागणार असल्याची पक्षाची भूमिका आहे.

एक लाखावर सदस्य

रिपब्लिकन पक्षाने शहरात एक लाखांपेक्षा अधिक सदस्य नोंदणी केली आहे. एक हजार ३०० क्रियाशील सदस्य आहेत. त्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. पक्षाच्या शहराध्यक्षांची निवड लोकशाही पद्धतीने सदस्यांमधून निवडणूक घेऊन केली आहे. क्रियाशील सदस्यांची कार्यकारिणीही जाहीर केली आहे. शिवाय, महिला, युवक, अल्पसंख्याक अशा आघाडीही स्थापन केल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com