सर्व मानवजात एकाच ईश्वराची लेकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व मानवजात 
एकाच ईश्वराची लेकरे
सर्व मानवजात एकाच ईश्वराची लेकरे

सर्व मानवजात एकाच ईश्वराची लेकरे

sakal_logo
By

इस्लाम धर्माची मुख्य इमारत मूळ पाच स्तंभांवर उभी आहे. या पाच स्तंभांत पहिला प्रमुख स्तंभ म्हणजे ‘परमेश्वर एक आहे.’ (ला इलाह इल्लल्लाह) हे तत्त्वच मुळी मानवी जीवनात क्रांती करणारे आहे. परमेश्वर एक आहे, ही विचारसरणी प्रेमाचा ओलावा निर्माण करते. त्यामुळे आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत, सर्व विविध जाती धर्माच्या लोकांशी बंधुभावाने वागले पाहिजे व आपण एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे, एकमेकांचे दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही उदार वृत्ती आपल्या अंगी येते. एकेश्वर (अद्वैत) तत्त्वामुळे मानवाचा दृष्टिकोन विशाल होतो.
हजरत महंमद पैगंबर हे परमेश्वराचे प्रेषित आहेत, हा वरील आद्यतत्त्वाचा उत्तरार्ध (मुहम्मदुर्र रस्लुल्लाह) आहे. हजरत महमंद पैगंबरांनी जी उदात्त शिकवण दिली, ती आत्मसात करणे असा या उत्तरार्धाचा निष्कर्ष आहे. इस्लाम धर्म हा घट्ट चौकटीत किंवा बंद पठडीत अडकलेला नसून, तो अत्यंत विज्ञाननिष्ठ व बुद्धीप्रामाण्यवादावर आधारलेला आहे. याबाबतीत खुद्द हजरत पैगंबरांचाच एक दाखला पुरेसा आहे.

हजरत पैगंबरांनी बुद्धीवादास मोठे स्थान दिले आहे. ज्यावेळी ‘मुआझ’ यांना यमनचे गव्हर्नर नेमण्यात
आले, त्यावेळी हजरत पैगंबरांनी त्यांना विचारले, ‘कोणत्या आदेशाप्रमाणे तुम्ही गव्हर्नर या नात्याने वागाल?’

त्यावेळी ‘मुआझ’ म्हणाले, ‘पवित्र कुराणाच्या आदेशानुसार मी वागेन,'' ‘‘पण, त्यात तुम्हांस हवा असलेला आदेश सापडला नाही तर?’’
‘‘तर आपण (हजरत पैगंबर) घालून दिलेल्या शिकवणीप्रमाणे मी वागेन.’’
‘‘पण, त्याही बाबतीत तुम्हाला आधार मिळाला नाही तर?’’
‘‘तर मी बुद्धिवादाचा आश्रय घेईन.’’ हजरत पैगंबरांना ‘मुआझ’नी दिलेले शेवटचे उत्तर अतिशय आवडले व ‘मुआझ’चा आदर्श आपल्यासमोर ठेवावा असे त्यांनी इतर प्रतिनिधींना सांगितले. म्हणून पवित्र कुराणचे पठण (पारायण) करून हजरत पैगंबराचे विचार जीवनात प्रत्यक्ष उतरविण्याची
पाठशाळा म्हणजे रमजानचा पवित्र महिना.

डॉ. एस. एन. पठाण (लेखक माजी कुलगुरू व विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे सल्लागार आहेत )
इफ्तार ६.५२ (शुक्रवारी सायंकाळी)
सहेरी : ५.०२ (शनिवारी पहाटे)

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..