पिंपरी : शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांनाच प्राधान्य हवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theater
नाट्यगृहांमध्ये नाटकांनाच प्राधान्य हवे

पिंपरी : शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांनाच प्राधान्य हवे

पिंपरी - शहरातील स्थानिक अनेक नाट्यकलाकार विविध चित्रपटांमध्ये, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अनेक मालिकांमध्ये दिसतात. त्यांनी आपल्या उभरत्या वयात येथील नाट्य प्रयोगांमध्ये कामे करून त्यांनी ही वेगळी उंची गाठली आहे. मात्र, आता त्यांची नाटके घेवुन शहरात येता येत नाहीत, अशी खंत त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना व्यक्त केली आहे. शहरातील नाट्यगृहांमध्‍ये नाटकांऐवजी होणाऱ्या राजकीय-सामाजिक कार्यक्रमांचा हा परिणाम असल्याचा हा परिणाम असून शहरातील नाट्य रसिक दुरावत निघाला असल्याचेही ते म्हणाले. यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन, नाट्य परिषद यांनी एकत्र येवून काही ठोस निर्णय घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

पुण्यासारखे सांस्कृतिक वातावरण येथे तयार व्हावे. येथील रसिकांना चांगली नाटके पाहता यावीत यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात चार नाट्यगृहे बांधली आहेत. निगडी येथे अजून उभारले जात आहे. मात्र, चारही नाट्यगृहांमध्ये नाटके कमी आणि इतर कार्यक्रमच जास्त होत असल्याची स्थिती ‘सकाळ’ने मांडली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील कलाकारांना काय वाटते याविषयी त्यांचीही भावना जाणून घेतली.

तेजस्विनी कोळेकर

मुळात पिंपरी -चिंचवड हा परिसरात अजून हवे तसे सांस्कृतिक वातावरण विकसित झालेले नाही. युवा पिढीतील अनेकजण कला जपण्याचा प्रयत्न निष्ठेने करताना दिसतात. माझे अनेक मित्र- मैत्रिणी देखील यामध्ये अत्यंत जोमाने यात काम करताना मी पहिले आहे. पण वातावरणाचा एक प्रभाव असतोस तो आपल्याला टाळता येत नाही. तेच आपण पुण्यातील दृश्य पहिले तर लगेच फरक जाणवून येतो. जिथे वयाच्या पाचव्या वर्षांपासून विविध कलाप्रकारांचे प्रशिक्षण त्यांना उपलब्ध करून दिले जाते. तिथे सुशिक्षित वर्ग जास्त प्रमाणात दिसून येतो.

अभिषेक रत्नपारखी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक अशा महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. परंतु व्यावसायिक नाटक म्हटले तर त्याकडे थोडे दुर्लक्ष केले जाते. यामागील खरे कारण म्हणजे या शहरामध्ये अगदी थोड्या प्रमाणात नाटकांचे प्रयोग होतात. नाट्यप्रेमी रसिक आहेत, पण त्यांचा हिरमोड होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनेकदा नाट्यगृहांमध्ये शनिवार, रविवारच्या तारखा मिळत नाहीत.

गंधर्व गुळवेलकर

मागील काही वर्षांपासून अनेक नाट्यनिर्माते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रयोग करण्यास उत्सुक असतात. मात्र, तिकीट दरही मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या खिशाला परवडणारे हवेत. विविध शिबिरे, संमेलने व इतर कल्पक योजनांद्वारे नाट्यकलेबद्दल आणखी जनजागृती केल्यास प्रेक्षकांची नाटकाविषयीची आवड वाढू शकेल. त्याचप्रमाणे खासगी छोटेखानी नाट्यसंस्थांच्या प्रायोगिक नाट्यचळवळीला आर्थिक साहाय्य लाभले, तर शहरातील अनेक हरहुन्नरी कलाकारांच्या गुणवत्तेला खतपाणी मिळेल.

प्रथमेश जाधव

दर शनिवारी आणि रविवारी राजकीय ,सामाजिक लोकांचे कार्यक्रम असतात. नाट्यगृह बुक करायला गेल्यावर ते नाट्यगृह आधीच कार्यक्रमांमुळे बुक झालेले असते. नाट्यगृहे ही नाटकांसाठी कमी आणि इतर कार्यक्रमांसाठी अधिक वापरली जातात. अनेकदा रंगकर्मींनी चौकशी करून देखील त्यांना त्यांचा स्लॉट मिळत नाही. कारण ते स्लॉट आधीच जास्त पैसे देऊन मोठे व्यक्ती राखीव ठेवतात. आणि याच गोष्टीमुळे अनेकदा अचानक नाटक देखील रद्द करावे लागते. म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी नाटके कमी प्रमाणात होतात. आपल्या नाटकाला प्राइम टाइम आणि आणि शनिवार रविवारचे स्लॉट मिळाले तर पिंपरी-चिंचवड देखील पुण्याइतकेच नाटकासाठी सुद्धा ओळखले जाईल.

ऋतू आंद्रे

पिंपरी-चिंचवडमध्ये कलाकारांना नाटक करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. महापालिकेकडून कलाकारांना काही वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी मोफत नाट्यगृहे द्यावी. रंगीत तालीम महिनाभर चालणाऱ्या प्रयोगांच्या सरावासाठी जागेचे भाडे देखील परवडत नाही. अनेक कलाकार असे असतात की त्यांना तालीम, नाटके आणि इतर अनेक प्रयोग करायचे असतात त्यांच्यासाठी महानगरपालिकेने एखादा हॉल तयार करून दिला पाहिजे. किंवा या वेळेमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन तुमची तालीम करू शकता अशी वेळ तरी नाट्यगृहाचे ठरवून दिली पाहिजे. रंगीत तालमीच्या सरावासाठी नाट्य प्रेमींना जागाच राहिलेली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Akr22b00276 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top